निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्राचे गौडबंगाल

By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:39+5:302015-03-14T23:45:39+5:30

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र निकृर्ष्ठ दजार्चे असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने व चांगल्या दजार्ची पदवी प्रमाणपत्र मोफत देण्यात यावीत,अशी मागणी विद्यापीठाच्या अनेक अधिसभा सदस्यांनी केली. तसेच पदवी प्रमाणपत्र तयार करताना दूर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी भूमिका घेतली.त्यावर येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत (बीओई) सखोल चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभा सदस्यांना दिले.

Gowdabangal of Degree level Degree Certificate | निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्राचे गौडबंगाल

निकृष्ट दर्जाच्या पदवी प्रमाणपत्राचे गौडबंगाल

Next
णे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र निकृर्ष्ठ दजार्चे असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने व चांगल्या दजार्ची पदवी प्रमाणपत्र मोफत देण्यात यावीत,अशी मागणी विद्यापीठाच्या अनेक अधिसभा सदस्यांनी केली. तसेच पदवी प्रमाणपत्र तयार करताना दूर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी भूमिका घेतली.त्यावर येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत (बीओई) सखोल चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभा सदस्यांना दिले.
विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या पदवी प्रदान समारंभात लाखो विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे निकृष्ट दजार्ची आहे.यावर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या सदस्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच विद्यापीठाने काळ्या यादीत टाकलेल्या संस्थेकडून पदवी प्रमाणपत्र तयार करून घेतल्याची चर्चा सुरू होती.त्यामुळे अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी शनिवारी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला.तसेच विद्यापीठाने ही निकृष्ट दजार्ची प्रमाणपत्रे परत घेवून विद्यार्थ्यांना चांगल्या दजार्ची पदवी प्रमाणपत्र प्रमाणपत्रासाठी दिलेल्या 300 रुपयांचा हिशोब द्यावा,पदवी प्रमाणप्रत्राचे वितरण विद्यापीठाच्या उपकेंद्रात किंवा महाविद्यालयात केले जावे,अशी विविध मते विद्यापीठाच्या इतरही अधिसभा सदस्यांनी मांडली.त्यावर विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सविस्तरपणे मांडली.
गाडे म्हणाले, विद्यापीठाने काळ्या यादीतील संस्थेला पदवी प्रमाणप्रमाण तयार करण्याचे काम दिले नाही.ऑनलाईन निविदा देवूनच पदवी प्रमाणपत्र देण्याचे काम केले आहे. त्यात कोणताही गैरप्रकर झालेला नाही.पदवी प्रमाणपत्र तयार करताना संबंधित कंत्राटदाराने मोठ्या चूका केल्या होता.त्याने तयार केलेले प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरित करणे शक्य नव्हते.त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाला स्वत:हून वेगळ्या संस्थेतर्फे प्रमाणपत्र तयार करून घेतले. ते तयार करताना कोणतीही तडजोड केली नाही.तसेच चूकीचे प्रमाणपत्र तयार करणा-या संथेला अद्याप एका रुपयाचे वेतन दिले नाही.तसेच संबंधित संस्थेला विद्यापीठाने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घतेला आहे.
विद्यार्थ्यांनय वाटण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्राचा कागद निकृष्ट असल्याचे विद्यापीठाला मान्य आहे,असे नमूद करून डॉ.गाडे म्हणाले, विद्यार्थांच्या मागणींनुसार यंदा त्यांना लॅमिनेशन केलेले पदवी प्रमाणपत्र दिले नाही.परंतु,या पुढील काळात विद्यापीठातर्फे उच्च दजार्चे पदवी प्रमाणपत्र देण्याबाबत काळजी घेतली जाईल.त्याच प्रमाणे यंदा वाटप करण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्रावर येत्या बीओई च्या बैठकीत घेतला जाईल.

Web Title: Gowdabangal of Degree level Degree Certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.