गुरूपौर्णिमा पा
By admin | Published: August 1, 2015 12:19 AM2015-08-01T00:19:02+5:302015-08-01T00:19:02+5:30
पाटील महिला महाविद्यालय
Next
प टील महिला महाविद्यालय सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली़ यावेळी व्यासपीठावर मल्लिनाथ अंजुनगीकर, डॉ़ प्रा़ संतोष राजगुरु, उपप्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ़ रावसाहेब ढवण, डॉ़ प्रशांत नलवडे आदी उपस्थित होते़ यावेळी विद्यार्थिनींच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी निशा भोसले, प्रियांका देशमुख, स्नेहा थिटे, भाग्यश्री यादव आदी उपस्थित होते़ फोटो --लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी प्राचार्य गोसावी यांचा सत्कार केला़ याप्रसंगी प्रा़ मल्लिनाथ अंजुनगीकर, प्रा़ संतोष राजगुरु, उपप्राचार्य डॉ़ राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ़ रावसाहेब ढवण, डॉ़ प्रशांत नलावडे छत्रपती शिवाजी प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशालेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली़ याप्रसंगी मुख्याध्यापिका विजया पाटील, अनुराधा लिमये, उपमुख्याध्यापक अनिल लोंढे, प्रकाश रणदिवे, जयश्री साठे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी मुख्याध्यापक आणि अतिथी शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला़ बिराजदार पाटील प्रशालाविजापूर रोडवरील कै़ मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार-पाटील प्रशालेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापक रे़भिग़ुरव होते़ पंचाक्षरी स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती़ याप्रसंगी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावल्याबद्दल नागेश हजारे याला मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी लालसिंग चव्हाण, सिद्धेश्वर पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार आदी उपस्थित होते़ यलगुलवार प्रशाला चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली़ यावेळी प्राचार्या स्मिता गलगली, मल्लिकार्जुन निलंगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी पूजा बनसोडे, सुरेश बटगिरे, विशाखा कोळी आदी उपस्थित होते़ समर्थ विद्यामंदिरशास्त्रीनगर येथील समर्थ विद्यामंदिरात गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण शिखरे होते़ प्रमुख अतिथी म्हणून संस्थापिका ताराबाई शिखरे, सचिव उदयकुमार शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी विद्यार्थ्यांनी व्यासपौर्णिमेबाबत माहिती दिली़ शाळेतील शिक्षकांना गुलाबाची फुले देऊन त्यांचा गौरव करण्यात आला़ श्रुती शिखरे हिने सूत्रसंचालन केले़ बाळे कन्या प्रशालाबाळे येथील कन्या प्रशालेत शिक्षकांचा गुरूपौर्णिमेनिमित्त गौरव करण्यात आला़ यावेळी एम़ आऱ घोडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते़ मुख्याध्यापिका आऱ जी़ सावंत, एम़जी़मुळे, एऩआऱआवताडे यांची उपस्थिती होती़