हॅलो 1 : धेंपे चतुर्थी जोड
By Admin | Published: September 15, 2015 06:48 PM2015-09-15T18:48:08+5:302015-09-15T18:48:08+5:30
चौकट :
च कट : खास भाड्याची फेरीबोटदीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आम्ही दरवर्षी खास भाड्याने फेरीबोट घेतो. रात्री आठच्या सुमारास विसर्जनासाठी निघतो. आमच्या गणेशमूर्तीची मिरवणुकीत बाबा (म्हणजे र्शीनिवास धेंपे) यांचे चालक विशेष सजावट करतात. शिमग्याच्यावेळी जसा देखावा तयार केला जातो, तसा चित्ररथासारखा देखावा चतुर्थीवेळी तयार केला जातो. गणेशमूर्तीचे मांडवी नदीत विसर्जन केले जाते. या वेळी आम्हा सर्वांच्या मनात भक्तिभाव दाटून आलेला असतो, असे राजेश धेंपे म्हणाले.-----------------------हे सगळे येतात एकत्रगुरुदास, सुरेंद्र, विश्वासराव, र्शीनिवास, जयप्रकाश, सुभाष, विवेक, योगिष, गोविंदराज, यतीश धेंपे यांच्यासह धेंपे कुटुंबातील अन्य सर्व लहानमोठे तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला एकत्र येतात. गणेशमूर्तीच्या पूजेसाठी भटजी येतात. ......