एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

By admin | Published: May 25, 2016 10:59 PM2016-05-25T22:59:43+5:302016-05-26T00:02:30+5:30

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

HPT RYK students succeed in HSC exam | एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

Next

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी
नाशिक : एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.०६ %, एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८९.८४ % लागला असून विज्ञान शाखेचा सोहम पाचपांडे (९३.०७ %), करिना बोहरा (९२.१५ %), विशाखा नंबियार( ९१.५३ %)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर यश संपादन केले, तर कला शाखेत चैताली पत्कीने ८७.२३ % गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. तर उत्तरा वाघ ( ८६.४६ %) हिने दुसरे व मुग्धा साठे (८६ %)हिने तिसरे स्थान प्राप्त केले. विज्ञान शाखेतील बहुतेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करीत बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत पूनम पुजारे (७९.५४ %), ऐश्वर्या पवार (७७.७० % ) व हर्षदा जाधव ( ७६.३०)यांनी अनुक्रमे एक, दोन, तीन क्रमांक मिळवले.

डॉ. एम. एस. गोसावी सायन्स ॲण्ड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय
नाशिक : डॉ. एम. एस. गोसावी सायन्स ॲण्ड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १०० %, तर वाणिज्य शाखेचा ८८.४६ % निकाल लागला. विज्ञान शाखेतील वरद कुलकर्णी (९०.४६ %), रोहित काळे (८४.१५ %), मोईन खान ७८.४६ टक्के गुण संपादन केले, तर वाणिज्य शाखेतील सृष्टी दुबे (७४.४६ %), यश शाह (७३.३८%), श्रेयस पेंडसे ६८.३० टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.

व्ही. एन. नाईक महाविद्यालय
नाशिक : व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा आर्यन साव्हने याने ९१.५३ टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला. तर शलाका कोठावदे ८८.६१ टक्के गुण मिळवून दुसरे स्थान राखले. वाणिज्य शाखेत सोनू मंते ८२.७६% तर योगेश रुलेने ७८ टक्के गुण संपादन केले. कला शाखेतील आरती जाधव हिला ८२.१५ % व प्रतीक्षा वाघ हिला ७६.१५ टक्के गुण मिळाले.

( व्ही. एन. नाईक महाविद्यालय संस्थेचा एन्फो दुसर्‍या बातमीत आहे, दोन्ही जोडून घेणे पहिला आलेला विद्यार्थ्यांचा फोटो २५ आर्यन साव्हणे यानावाने सेव्ह आहे.)
(फ्रावशी अकॅडमीच्या ६ विद्यार्थ्यांचे फोटो आर फोटोला आहे)

Web Title: HPT RYK students succeed in HSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.