आजपासून बारावीची परीक्षा सुरू

By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:48+5:302015-02-21T00:50:48+5:30

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.

HSC examinations are going on from today | आजपासून बारावीची परीक्षा सुरू

आजपासून बारावीची परीक्षा सुरू

Next
णे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.
राज्यातील ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी मंडळाचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते.
मागील वर्षी १२ लाख ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती,असे नमूद करून पाटील म्हणाले, यंदा ७ लाख ५७ हजार १३६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून मागील वर्षी ६ लाख ६४ हजार १२० मुलांनी नोंदणी केली होती. तसेच गेल्या वर्षी ५ लाख ३६ हजार ४२९ मुलींनी केली होती. त्यात सुमारे ४५ हजाराने वाढ झाली असून यंदा ५ लाख ८२ हजार ०६६ मुली परीक्षा देणार आहेत.
पाटील म्हणाले,राज्य मंडळातर्फे पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार असून बहुतांश परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाही गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ या प्रमाणे राज्यात एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी बैठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मंडळातर्फे घेतल्या जाणा-या माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून यंदा ९३ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,असे नमूद करून पाटील म्हणाले, मागील वर्षी ७८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विषय घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १४ हजाराने वाढ झाली आहे.तसेच १७ नंबरच अर्ज भरून परीक्षा देणा-या विद्यार्थांची संख्याही वाढत चालली आहे.
--------------------------

Web Title: HSC examinations are going on from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.