हुश्श... दहावीची परीक्षा संपली
By admin | Published: March 20, 2015 10:39 PM2015-03-20T22:39:57+5:302015-03-20T22:39:57+5:30
पुणे : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची मराठी माध्यमाची परीक्षा शुक्रवारी संपली. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुस्कारा सोडला. आता त्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.
Next
प णे : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची मराठी माध्यमाची परीक्षा शुक्रवारी संपली. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुस्कारा सोडला. आता त्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा दि. ३ मार्च पासून प्रथम भाषा असलेल्या मराठी विषयाने झाली. बहुतेक मराठी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या दिवसापासून सुरू झाली होती. शुक्रवारी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा झाली. या विद्यार्थ्यांचा हा अखेरचा पेपर होता. बहुतेक विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा या पेपर दिल्यानंतर संपली आहे. परीक्षा संपल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण कमी झाला आहे. तसेच पालकांचा भारही कमी होणार आहे. साधारणपणे जून महिन्यात दहावीचा निकाल लागतो. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.ज्या विद्यार्थ्यांची मराठीसह अन्य भाषा द्वितीय व तृतीय भाषा विषय आहेत, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत चालणार आहे. सोमवारपासून द्वितीय व तृतीय मराठी व इतर विषयांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर हे दहावीचे विद्यार्थी परीक्षेतून मोकळे होणार आहेत. ----------