निकाल जाहिर होऊनही गुणपत्रिका मिळेनात परीक्षा विभाग: गुणपत्रिका छपाईचे काम कंत्राटदाराकडे

By admin | Published: July 18, 2015 01:12 AM2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास विलंब होत आहे.परिणामी पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना विविध अडचणी सामोरे जावे लागते. त्यामुळे ऑनलाईन निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मुळगुणपत्रिका द्याव्यात. तसेच पुनर्मुल्यांकन व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती केव्हा उपलब्ध होतील यासाठी स्वतंत्र लिंक सुरू करावी,अशी मागणी केली जात आहे.

If the result is declared, the result sheet will be found in the examination department: Printing of the mark sheet is done by the contractor | निकाल जाहिर होऊनही गुणपत्रिका मिळेनात परीक्षा विभाग: गुणपत्रिका छपाईचे काम कंत्राटदाराकडे

निकाल जाहिर होऊनही गुणपत्रिका मिळेनात परीक्षा विभाग: गुणपत्रिका छपाईचे काम कंत्राटदाराकडे

Next
णे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास विलंब होत आहे.परिणामी पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना विविध अडचणी सामोरे जावे लागते. त्यामुळे ऑनलाईन निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मुळगुणपत्रिका द्याव्यात. तसेच पुनर्मुल्यांकन व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती केव्हा उपलब्ध होतील यासाठी स्वतंत्र लिंक सुरू करावी,अशी मागणी केली जात आहे.
विद्यापीठाचा परीक्षा विभाग गेल्या वर्षभरापूर्वी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत होता.गेल्या काही महिन्यांपासून विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालत असल्याचे दिसत असले तरी पुनर्मुल्यांकनाचे अर्ज भरताना आणि छायांकित प्रती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या मागील पदवीप्रदान समारंभामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. लाखो विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांच्या छपाई कंत्राटदाराकडून होते. तसेच अभियांत्रिकी विद्याशाखा वगळता इतर विद्याशाखांच्या गुणपत्रिकांची छपाई कंत्राटदाराकडूनच होते. विद्यापीठातर्फे बहुतांश परीक्षांचा निकाल 30 ते 40 दिवसात ऑनलाईन पध्दतीने जाहीर केला जातो. मात्र,त्यानंतर 15 ते 20 दिवस उलटूनही कंत्राटदाराकडून गुणपत्रिकांच्या छपाईचे काम केले जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
विद्यापीठाकडे स्वत:ची प्रिंटिंग प्रेस असून तज्ज्ञ सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहेत.त्यांचा उपयोग करून विद्यापीठाने हळूहळू स्वत:ची प्रिटिंग यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.मात्र,विद्यापीठाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. विद्यापीठामध्ये सध्या केवळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकांची छपाई केली जाते. इतरही गुणपत्रिकांच्या छपाईचे काम केले तर ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकतील. एमबीएच्या सुमारे 7 हजार तर बी.ए.बी.कॉम,बीएस्सी.एमसीए आदी अभ्यासक्रमाच्या लाखो विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची वाट पहावी लागणार नाही. दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

चौकट-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीच्या शुल्कात घट करण्यात आली असली तरी त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर ठळकपणे प्रसिध्द केले नाही.तसेच छायांकित प्रतीसाठी किती शुल्क भरावे,किती तारखेपर्यंत अर्ज करावा,याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे,त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लिंग तयार करून त्यात महत्त्वाची परिपत्रपत्रके एकाच ठिकाणी प्रसिध्द करावीत.
- विवेक वेलणकर,सजग नागरिक मंच

Web Title: If the result is declared, the result sheet will be found in the examination department: Printing of the mark sheet is done by the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.