योग्य मार्ग निवडल्यास जीवन यशस्वी - देशमुख

By Admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30

दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मस्

If you choose the right path, life is successful - Deshmukh | योग्य मार्ग निवडल्यास जीवन यशस्वी - देशमुख

योग्य मार्ग निवडल्यास जीवन यशस्वी - देशमुख

googlenewsNext
ंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
कवी प्रशांत केंदळे यांनी मार्गदर्शन करता करता आपल्या हास्यकवितांबरोबरच उद्बोधक कविता ऐकवून विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण न घेता परीक्षेकडे संधी म्हणून पाहण्याचे व कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील चांगल्या गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी जीवनात श्रमाचे महत्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक ए.वाय.हडस , स्कूल कमीटी उपाध्यक्ष सोपान रहाणे ,बाळासाहेब विधाते , सुरेश घुमरे , शंकर वाघ , दत्तात्रेय दाभाडे ,मधुकर घुमरे ,निवृत्ती घुमरे, दशरथ विधाते , माजी पंचायत समतिी सदस्य सुनिल घुमरे आदींसह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कु.दिपाली घुमरे व चैताली सुर्यवंशी यांनी तर आभार त्रिवेणी घुमरे हिने मानले. (०२ दिंडोरी१)

Web Title: If you choose the right path, life is successful - Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.