महत्त्वाची ...पान ७ --सहकारी संस्थांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा : ढवळीकर
By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:18+5:302015-07-22T00:34:18+5:30
सहकारी संस्थांचा लाभ
Next
स कारी संस्थांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा : ढवळीकरवेलिंग : विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी व्हीपीके अर्बन आणि व्हीपीके बाजार संस्था विविध उपक्रम राबवित आहे. सहकार क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर असून अशा सहकारी संस्थांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री दीपक ढवळीकर यांनी केले. गोठण येथील श्री शांतादुर्गा शंखवाळकरीण सभागृहात व्हीपीके अर्बन आणि व्हीपीके बाजार या संस्थांतर्फे शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ७१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.वागळे हायस्कूल मंगेशी, स्वस्तिक विद्यालय प्रियोळ, शिक्षासदन हायस्कूल नगर प्रियोळ, नवदुर्गा हायस्कूल मडकई, आनंदीबाई हायस्कूल करंजाळे, मडकई या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.या वेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे, सरपंच दामोदर नाईक, उपसरपंच सुकांती गावडे, व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष हिरू खेडेकर, व्हीपीके बाजारचे अध्यक्ष डॉ. सूर्या गावडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक तराळे, उमेश नाईक, मिताशा ऐगल उपस्थित होते. या वेळी व्हीपीकेच्या लाभधारकांना धनादेश देण्यात आले. या वेळी मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. डॉ. सूर्या गावडे व हिरू खेडेकर यांनी स्वागत केले. तुळशीदास गावडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)ढँङ्म३ङ्म : 2007-ढडठ-01 कॅप्शन: गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करताना मंत्री दीपक ढवळीकर. बाजूस शिवदास गावडे, दामोदर नाईक, हिरू खेडेकर, डॉ. सूर्या गावडे. (प्रभू फोटो)