उमवित क्षयरोग जागृती सप्ताहाचे उद्घाटन
By admin | Published: March 22, 2016 12:39 AM2016-03-22T00:39:28+5:302016-03-22T00:39:28+5:30
जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
Next
ज गाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन. प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्रा. अर्चना देगावकर, प्रा. सत्यजित साळवे, डॉ. शांताराम नारखेडे, डॉ. सोनाली जवंजाळ, डॉ. शीतल पाटील, डॉ.नीलिमा पाटील, चंद्रकांत इसे, मंगला लोणे, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी, विवेक सोनवणे उपस्थित होते. सप्ताहांतर्गत उमविने दत्तक घेतलेल्या पाच गावांमध्ये क्षयरोग जनजागृती व जलजागृती अभियान होणार आहे. सावदा (ता एरंडोल) येथे सायंकाळी डॉ.नीलिमा पाटील यांचे व्याख्यान व समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य झाले. २२ रोजी सकाळी ११ वाजता कुलसचिव प्रा. महाजन यांच्या उपस्थितीत रामनगर ता.धुळे येथे जनजागृती कार्यक्रम व पथनाट्य सादर होणार आहे. काठी ता. धडगाव येथे मोठ्या प्रमाणात होळीचे आयोजन होते. यामुळे २३ रोजी क्षयरोग निर्मूलन जनजागृती केली जाणार आहे. २६ रोजी उसमळी ता. यावल येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताह उद्घाटन कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.शीतल पाटील यांनी मानले.इन्फो-केंद्र सरकारने क्षयरोगमुक्त भारत मोहीम हाती घेतली असून उमविने या मोहिमेंतर्गत चॅलेंज टीबी- युनियन सोबत करार केला आहे. त्याचा भाग म्हणून क्षयरोग निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.