स्वातंत्र्य दिन पत्रक १

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:04+5:302015-08-18T21:37:04+5:30

विश्वदृष्टी समाजसेवा संस्था

Independence Day Sheet 1 | स्वातंत्र्य दिन पत्रक १

स्वातंत्र्य दिन पत्रक १

Next
श्वदृष्टी समाजसेवा संस्था
कुमठा नाका परिसरातील विश्वदृष्टी समाजसेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला़ यशस्वी टेक्स्टाईल्सचे शंकर देवसानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश विश्वनाथ, रमेश केंदोळे, सविता गुडा, ज्ञानेश्वर माचर्ला, शैलेश कंदी, प्रमोद निंबाळकर, भरत बोल्ली, ज्ञानराज सोमनाथ, करण याटकर, व्यंकटेश सोमा, जमुना मैले, महेश पिठ्ठा उपस्थित होते़
लोकमंगल कृषी विद्यालय
वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात आ़ सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ याप्रसंगी संस्थेच्या सचिव अनिता ढोबळे, आयएएस अधिकारी महेश लोंढे, रोहन शिंदे, प्राचार्य शाम गोवर्धन, पांडुरंग शेणमारे, सतीश करंडे, धनंजय शिंदे, सचिन फुगे, किरण जगताप, विनायक सुतार, गणेश कोनेरी, विश्वेश्वरय्या स्वामी आदी उपस्थित होते़
भैरुरतन दमाणी अंधशाळा
दमाणी नगर येथील भैरुरतन दमाणी अंधशाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला़ इनरव्हील क्लबच्या संगीता वर्धमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल चंडक, सुजाता घोडगे, हिरालाल डागा, सचिन जम्मा, धनशे˜ी, कहाते, लातुरे आदी उपस्थित होते़
इंदिरा कन्या प्रशाला
शिंदे चौकातील इंदिरा कन्या प्रशालेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला़ संस्थेच्या अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी निकि ता क्षीरसागर, पांडुरंग देशपांडे, मुख्याध्यापिका वैशाली लोंढे, मुख्याध्यापिका अनुजा शिंगाडे, शांता चव्हाण, शफीया काझी, देशपांडे, अंबिके आदी मान्यवर उपस्थित होते़
मानवता प्रशाला
घोडातांडा येथील मानवता विकास विद्यामंदिरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ उद्योगपती मदन वडवेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ यावेळी एस़पी़ तोळणुरे, मुख्याध्यापक एस़आय़व्हनमाने, करजगीकर आदी उपस्थित होते़
गांधी नाथा रंगजी विद्यालय
बाळीवेस परिसरातील गांधी नाथा रंगजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला़ डॉ़ दिलीप आपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संस्थेचे डॉ़ सी़ जे़ दोशी, राजेंद्र बीडकर, मयुरा शहा, मुख्याध्यापिका स्मिता पुरवत, सुनंदा बुधनेर, सुनीता सिंग, प्रतिभा काटकर, विद्या चव्हाण, रेखा बोंदार्डे आदी उपस्थित होते़
मनपा शाळा क्रमांक ४
रामवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ४ मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला़ मुख्याध्यापक सुभाष कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ याप्रसंगी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शेख, येवलेकर, कावेरी दोडमनी, मेघा ढाळे, ऐश्वर्या जाधव आदी मान्यवर उपस्थित होते़

Web Title: Independence Day Sheet 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.