्न्नगुणपत्रक फेरफार प्रकरणी विद्यापीठाकडून चौकशी सुरु

By Admin | Published: February 29, 2016 10:03 PM2016-02-29T22:03:05+5:302016-02-29T22:03:05+5:30

जळगाव : भुसावळच्या प.क. कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थीनीने गुणपत्रकार फेरफार करुन पुढील वर्गात प्रवेश मिळविल्याचीबाब समोर आल्यावर उमविकडून या प्रकारणाची चौकशी सुरु आहे. मात्र उमवि व महाविद्यालयाकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जातआहे.

Inquiries of the University, in the case of mutation papers, the inquiry started by the university | ्न्नगुणपत्रक फेरफार प्रकरणी विद्यापीठाकडून चौकशी सुरु

्न्नगुणपत्रक फेरफार प्रकरणी विद्यापीठाकडून चौकशी सुरु

googlenewsNext
गाव : भुसावळच्या प.क. कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थीनीने गुणपत्रकार फेरफार करुन पुढील वर्गात प्रवेश मिळविल्याचीबाब समोर आल्यावर उमविकडून या प्रकारणाची चौकशी सुरु आहे. मात्र उमवि व महाविद्यालयाकडून या प्रकरणी गुप्तता पाळली जातआहे.
महाविद्यालयाची विद्यार्थीनी गायत्री संजय पाटील हिने विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात नापास असताना ही बनावट गुणपत्रकाच्या आधारे द्वितिय व तृतिय वर्षात प्रवेश मिळवून महाविद्यालय व विद्यापीठाची फसवून केल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला असून. या प्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला साबद्रा यांनी विद्यापीठाला पत्राद्वारे सुचना दिली आहे. या प्रकरणात परीक्षा विभागाकडून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ (३५) अनुसार गैर प्रकारासंबंधी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोटेचा महाविद्यालाकडून आपल्या स्तरावर तीन प्राध्यापकांच्या समितीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
दुर्लक्ष
महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाकडून कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन)मिळतो त्यात विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. असे असताना ही. विद्यार्थीनीने बनावट गुणपत्रक तयार करुन दुसर्‍या व तीसर्‍या वर्षाच्या आभ्यासक्रमात प्रवेश मिळविल्याची बाब दरम्यानच्या काळात विद्यपीठ व महाविद्यालयांच्या लक्षात येवू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोघांची चुप्पी
या प्रकरणात विद्यापीठ व महाविद्यालयाकडून भाष्य करणे टाळण्यात येत आहे. महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थीनीला प्रवेश दिला असल्याने तो कसा दिला. तर विद्यापीठाने तीला प्रवेशासाठी पात्र कसे ठरविले असे परस्पर विरोधी प्रश्न उपस्थित होत असल्यामुळेे. दोघांनी ही याबाबत भाष्य टाळले आहे.
प्रवेश समितीवर प्रश्नचिन्ह
महाविद्यालयामध्ये प्रवेश समित्यांच्या माध्यमातूून प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र या समितीकडून प्रवेश अर्जांची छाणनी व तपासणी होते.याबाब ही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रॅकेट सक्रीय
विद्यार्थीनीने सादर केलेले गुणपत्रक तयार करणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता आहे. या प्रकारणी आणखी कुणाचा संबंध आहे. याची तपासणी होण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

संबंधित विद्यार्थीनीला महाविद्यालयने प्रवेश दिला आहे.महाविद्यालयाच्या तक्रारीच्या अनुशंगाने विद्यापीठ कायद्यानुसार गैर प्रकारा बाबत कारवाई सुरु आहे.
डॉ. धनंजय कुलकर्णी
परीक्षा नियंत्रक, उमवि.

या प्रकारणी विद्यापीठाकडे पत्राद्वारे सुचना देण्यात आली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यावर याबाबत भाष्य करणे उचित ठरेल.
मंगला साबद्रा
प्राचार्य, प.क. कोटेचा महाविद्यालय.भुसावळ.

Web Title: Inquiries of the University, in the case of mutation papers, the inquiry started by the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.