जळगाव जिल्ाचा निकाल ८३.४६ टक्के बारावी परीक्षा : गेल्या वर्षाच्या तुलनेत निकाल ४ टक्क्यांनी घसरला
By admin | Published: May 25, 2016 10:24 PM2016-05-25T22:24:55+5:302016-05-25T22:24:55+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजेनंतर परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्ाचा निकाल ८३.४६ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी ८७.५९ इतकी असणारी जिल्ाच्या निकालाची टक्केवारी यंदा चार टक्क्यांनी घसरून ८३.४६ वर आली आहे.
Next
ज गाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजेनंतर परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्ाचा निकाल ८३.४६ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी ८७.५९ इतकी असणारी जिल्ाच्या निकालाची टक्केवारी यंदा चार टक्क्यांनी घसरून ८३.४६ वर आली आहे.यंदा जिल्ातून एकूण ४५ हजार २९२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. प्रत्यक्ष परीक्षा देणार्या ४५ हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचप्रमाणे १७ हजार ३१५ विद्यार्थी प्रथमश्रेणी, १८ हजार २९ विद्यार्थी द्वितीयश्रेणी तर ९०८ विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.