एकमेकाप्रती सहकार्याची भावना ठेवा- श्री गौरवकृष्णजी
By admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़
Next
न ंदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़ कौठा परिसरात श्री सालासर भजन मंडळ सेवा समितीच्यावतीने आयोजित श्रीरामकथेच्या सहाव्या दिवशीच्या सत्संगात व्यास हे भाविकांना उपदेश करीत होते़ प्रारंभी वेदघोष, मंत्रोच्चार करण्यात आले़ त्यानंतर गुरूवर्यांचे पुजन करण्यात आले़ शुक्रवारच्या सत्संगात त्यांनी कुटूंबातील आपला सहभाग, भोग आणि त्याग यासंबंधी श्रीराम चरित्राच्या आधारे स्पष्ट केला़ ते म्हणाले, सध्या सर्वचजण पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागला आहे़ कुणालाही गरजेपुरत्या पैशापेक्षा अधिक पैसा हवा असून जो-तो आपल्या पिढीसोबत पुढील पिढीचा नको तितका विचार करतो आहे, आपल्या पुढच्या पिढीला देखील अर्थाजनासाठी हात-पाय, बुद्धी असल्याचा जसा काय विसरच पडला आहे़ व्यवसाय आणि अर्थार्जन करताना व्यक्तीमध्ये एकमेकांबाबत घृणा निर्माण झाली आहे़ एकमेकांना मागे ओढण्याची जशी काय स्पर्धाच लागली आहे़ ते समाजाच्या विकासासाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले़आपल्या कौटुंबिक जीवनात कुण्याही महिलेला अथवा पुरूषाला कुटूंबाची जबाबदारी मुलांवर सोपविण्याची इच्छा दिसत नाही़ खरे तर आपले अपत्य कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम झाल्यास वयाच्या पन्नाशीनंतर आपण स्वत:हून आपल्या कमरेच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्या पाहीजे़ परंतू असे होतांना दिसत नाही़ श्रीरामांना राजा दशरथाने योग्यवेळी राज्यभिषेक करून समस्त आयोध्येच्या कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती़ ही सत्यता नाकारून चालणार नाही, असेही व्यास यांनी सांगितले़ सचसे मुह मोडने से क्या होगा,ये जहा छोडने से क्या होगाअपने मुंह की धूल साफ करो, आयना तोडणे से क्या होगा़़़ यावेळी त्यांनी जीवनातील मोक्षाबाबतही भाष्य केले़ ते म्हणाले, जीवनातील भगवंत प्राप्तीची इच्छा पुर्ण न होताच शरीर सोडल्यास तो आपला मृत्यू असतो तर इच्छापुर्तीनंतर शरीर सोडल्यास तो मोक्ष असतो़ त्यासाठी आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहीजे़