कायद्याला माणूसकीचा स्पर्श हवा

By Admin | Published: September 20, 2015 10:41 PM2015-09-20T22:41:42+5:302015-09-20T22:41:42+5:30

पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.

The law should touch the person's face | कायद्याला माणूसकीचा स्पर्श हवा

कायद्याला माणूसकीचा स्पर्श हवा

googlenewsNext
णे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन न्यायमूर्ती पिनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम, कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम,प्राचार्य डॉ.मुकुंद सारडा,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा,डॉ.अदिश अगरवाल,श्री.रविचंद्रन आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
पिनाक घोष म्हणाले,वकिली ही एक कला आहे,ती प्रत्येक वकिलाने आत्मसात करण्याची गरज आहे. वाद प्रतिवाद व साक्षीदारांची उलट तपासणी करणे ही सुध्दा एक कलाच आहे. उलट तपासणी करताना साक्षीदाराकडून सर्व माहिती काढून घेणे महत्त्वाचे असते. वकृत्व,मुद्दयांची मांडणी,तसेच कला जोपासण्याबरोबरच वकिलांना कायद्याची सखोल माहिती असणे अत्यंत्य गरजेचे आहे.
कार्यक्रमात मनन कुमर मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.मुकुंद सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो आहे -

Web Title: The law should touch the person's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.