व्यापक पातळीवर मराठीचा विकास, संवर्धन व्हावे (भाग २)

By admin | Published: February 11, 2015 11:47 PM2015-02-11T23:47:41+5:302015-02-11T23:47:41+5:30

चर्चासत्रात डॉ. दिवाकर मोहने यांनी मराठी भाषाविषयक धोरणाचा स्वीकार करीत औषधांची नावे व त्यावरील माहिती ही मराठीतून देण्याची तरतूद करण्याचे त्यांनी सुचविले. डॉ. सुनीती देव यांनी नव्या पिढीतील भाषा ज्ञान वाढविणे आवश्यक असून वेगळ्या भाषेतील लोक लिहिते होणे आवश्यक असल्याचे सांगितलेे. मराठीत प्रमाणभाषा असणे आवश्यक असून मराठी प्राध्यापक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. संध्या अमृते यांनी व्यक्त केले. तर काहींनी मराठीतील बोलीभाषेच्या मुद्यांकडे लक्ष वेधले. डॉ. मुनघाटे यांनी भाषा सेवक होणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करताना मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वांनीच एकत्रित काम करण्याची गरज सांगितली. या सूचनांवर विचार करून समिती भाषा धोरणात त्याचा अंतर्भाव करेल आणि प्रस्तावित भाषा धोरण शासनाकडे पाठवेल.

Marathi should be developed, promoted to a broad level (part 2) | व्यापक पातळीवर मराठीचा विकास, संवर्धन व्हावे (भाग २)

व्यापक पातळीवर मराठीचा विकास, संवर्धन व्हावे (भाग २)

Next
्चासत्रात डॉ. दिवाकर मोहने यांनी मराठी भाषाविषयक धोरणाचा स्वीकार करीत औषधांची नावे व त्यावरील माहिती ही मराठीतून देण्याची तरतूद करण्याचे त्यांनी सुचविले. डॉ. सुनीती देव यांनी नव्या पिढीतील भाषा ज्ञान वाढविणे आवश्यक असून वेगळ्या भाषेतील लोक लिहिते होणे आवश्यक असल्याचे सांगितलेे. मराठीत प्रमाणभाषा असणे आवश्यक असून मराठी प्राध्यापक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. संध्या अमृते यांनी व्यक्त केले. तर काहींनी मराठीतील बोलीभाषेच्या मुद्यांकडे लक्ष वेधले. डॉ. मुनघाटे यांनी भाषा सेवक होणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करताना मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वांनीच एकत्रित काम करण्याची गरज सांगितली. या सूचनांवर विचार करून समिती भाषा धोरणात त्याचा अंतर्भाव करेल आणि प्रस्तावित भाषा धोरण शासनाकडे पाठवेल.

Web Title: Marathi should be developed, promoted to a broad level (part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.