माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी बैठक
By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:57+5:302016-02-02T00:15:57+5:30
जळगाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केले आहे.
ज गाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केले आहे. का.उ. कोल्हे विद्यालयात पारितोषिक वितरण जळगाव - लोक शिक्षण मंडळ संचलित काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २ रोजी दुपारी दोन वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे असतील, उपस्थितीचे आवाहन संयोजकांनी केले आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह जळगाव - पिंप्राळारोडवरील गौरी पुत्र गणपती व श्री गुरूदत्त नवनाथ मंदिरात ३ ते १० फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या काळात दररोज रात्री साडे आठ ते दहा यावेळेत ह.भ.प. पांडुरंग महाराज, हभप अर्जुन महाराज, हभप रामदास महाराज, हभप समाधान महाराज, हभप मयुरी काळे, हभप इंद्रायणी सातव, हभप भगवान महाराज यांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळणार आहे. मंदिराचे पुजारी रमेश जोगी यांनी हा कार्यक्रम आयोजित केले असून भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. माध्यमिक शाळेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम जळगाव - डॉ. शंकर पुणतांबेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानव सेवा मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात सोमवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संघर्ष कल्याण अपंग बहुउद्देशीय संस्थेची बैठकजळगाव - संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेची ७ रोजी दुपारी १२ वाजता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. अपंग बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे.त्र्यंबकनगरातील खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त जळगाव - महाबळ कॉलनीतील त्र्यंबकनगरातील रस्त्यांची प्रचंड वाट लागली आहे. याबाबत तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्वरित या रस्त्याचे काम मार्गी लावावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.