व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या विदेश दौर्‍यावरून वाद !

By Admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:29+5:302015-07-20T23:59:29+5:30

Members of the Council of Management debate on foreign trips! | व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या विदेश दौर्‍यावरून वाद !

व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या विदेश दौर्‍यावरून वाद !

googlenewsNext
>मराठवाडा विद्यापीठ : विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचा विरोध

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आठ सदस्य अभ्यास दौर्‍यासाठी सपत्नीक युरोपला जाणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी दौर्‍याचे जोरदार समर्थन केले, तर विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दौर्‍याविरोधात विद्यार्थी आंदोलन छेडण्याच्या विचारात आहेत.
दुष्काळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना एकीकडे विद्यापीठीचे शुल्क भरणेही अवघड झाले असताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुपचूप परदेश दौर्‍यावर निघाल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. १ ऑगस्टपासून हा दौरा सुरू होईल. कोणालाही खबर लागणार नाही, अशा पद्धतीने विद्यापीठाने हा दौरा आखला. मात्र, ट्रॅव्हल्सची चार दिवसांपूर्वी बुकिंग झाल्यानंतर प्रकार उघड झाला.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या परदेश दौर्‍यासाठी २५ लाख रुपयांची मार्च महिन्यातच तरतूद करण्यात आली आहे. दौर्‍यासाठी प्रत्येक सदस्यावर एक लाख ८० हजार रुपये खर्च होणार आहेत. ज्यांच्या पत्नी दौर्‍यावर जातील, त्यांचा खर्च सदस्य स्वत: करणार आहेत. युरोपमधील ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचा अभ्यास करणे दौर्‍याचा उद्देश आहे, असे कुलगुरुंनी सांगितले.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कोणत्या विद्यापीठात जाणार आहेत, याचे उत्तर मात्र कुलगुरूंना देता आले नाही. कोणत्या विद्यापीठात जायचे त्याचा कार्यक्रम ठरविला जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पैशांची ही उधळप˜ी नाही का, यावर ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे चोपडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-----------------
सुमारे पंधरा दिवसांसाठीच्या या दौर्‍यात सदस्य जर्मनी, इटली, फ्रान्स, बेल्जियम, स्वीत्झर्लंड या देशांना भेट देणार आहेत.
---------------------

Web Title: Members of the Council of Management debate on foreign trips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.