वालचंद-डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30

सोलापूर : वालचंद कॉलेज कला व शास्त्र महाविद्यालय आणि आयसीएआर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. या दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या करारामुळे बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. जेनेटिक्स, एम. एस्सी. बायोइन्फॉरमेटिक्स तसेच इतर बायोलॉजिकल्स सायन्समध्ये पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात मदत होणार आहे.

Memorandum of Understanding between Walchand-Pulp Research Station | वालचंद-डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

वालचंद-डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

Next
लापूर : वालचंद कॉलेज कला व शास्त्र महाविद्यालय आणि आयसीएआर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. या दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या करारामुळे बी. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. जेनेटिक्स, एम. एस्सी. बायोइन्फॉरमेटिक्स तसेच इतर बायोलॉजिकल्स सायन्समध्ये पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात मदत होणार आहे.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे इंडियन कौन्सिल ऑफ अँग्रिकल्चरल रिसर्च या शासनमान्य संस्थेचे संशोधन केंद्र आहे. त्यामुळे वालचंद कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकल्प, संशोधन कार्य, शास्त्रज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार आहे, सुटीच्या कालावधीमध्ये मुलांना प्लॅण्ट टिश्यू कल्चरसारख्या शेतीनिगडित विषयात ट्रेनिंग घेता येईल व भविष्यात त्यांना स्वत:ची टिश्यू कल्चरची प्रयोगशाळा उभारता येईल.
डाळिंब संशोधन केंद्रात असणारी उपकरणे, तेथील अद्ययावत ग्रंथालय, त्यांच्याविषयी माहिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या करारामुळे मिळणार आहे.
या कराराची पूर्तता वालचंदचे प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर. के. पाल यांनी केली. याप्रसंगी वालचंदचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. आर. राव, जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. व्ही. ए. गरगडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. एन. व्ही. सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. दिनेश बाबू उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
वालचंद महाविद्याय व डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावेळी प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे, डॉ. आर. के. पाल, डॉ. के. आर. राव, प्रा. व्ही. ए. गरगडे आदी.

Web Title: Memorandum of Understanding between Walchand-Pulp Research Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.