चित्रकलेतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
By Admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:23+5:302016-01-24T22:20:23+5:30
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
ज गाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आर. आर. विद्यालयालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत जिल्हाभरातून ३ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधताना त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ही स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी, सचिव मुकुंद लाठी, सदस्य अविनाश लाठी, शिक्षणतज्ज्ञ एम. के. कासट, मुख्याध्यापक डी. एस. सरोदे, मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे, प्राचार्य पंकज कुलकर्णी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अरूण सपकाळे, बी. बी. तायडे, के. डी. शेलकर, बी. एम. सुतार, वाय. बी. न्हासदे यांनी परिश्रम घेतले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातील स्पर्धकांसाठी परिसरात स्वच्छता करणारी मुले, शेतात काम करणारे शेतकरी कुटुंब, वृक्षारोपणाचा कार्यक्रम व इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी राष्ट्रीय एकात्मता, भारतीय सण, उत्सव, दुष्काळग्रस्तांना मदत करणारे नागरिक असे विषय देण्यात आले होते. महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, बेटी बचाव, पाणी वाचवा यावर चित्रे काढली. स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. आर. आर. विद्यालयात तीन दिवस चित्रांचे प्रदर्शन स्पर्धेतील निवडक चित्रांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान जळगावकर नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पेपर शिल्पकार राजेंद्र गोळे यांच्या हस्ते होईल.