मसूदा प्रादेशिक भाषेत करण्यास मंत्र्यांची मान्यता जल मसुद्याला सूचनासाठी एक महिना वाढिव मुदत
By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:46+5:302016-02-02T00:15:46+5:30
फोटो : राज्यातील जलस्त्रोताचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जल धोरणात महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. (छाया : विशांत वझे)
फ टो : राज्यातील जलस्त्रोताचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जल धोरणात महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. (छाया : विशांत वझे)डिचोली : गोव्याचे जलस्त्रोत संकटग्रस्त बनलेले असताना ते पुर्नजीवीत करण्यासाठी त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी खास मोहिम आखण्यात आलेली असून गोव्याचे जलधोरणाचा राज्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे. जलधोरणाचा मसूदा मराठी व कोकणीत अनुवादीत करून तो प्रत्येक पंचायत व नगरपालिकापर्यंत पोचवण्यात येणार असून एक महिना खुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दिली. गोवा सरकारने हल्लीच जलधोरणाचा मसूदा इंग्रजीतून सर्व संकेतस्थळावर खुला केला होता. मात्र तो मराठीव कोकणी भाषेतून प्रसारित करावा, अशी मागणी पर्यावरण कार्यर्त्यांनी केली होती. सदर धोरणासंदर्भात जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दोन्ही भाषेत जलमसुदा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनतेने सर्व सूचना द्याव्यात यासाठी एका महिन्याची मुदत वाढवूनही दिली असून आपल्या सूचना देण्याचे आवाहन केले आहे. म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत, सरचिटणीस राजेंद्र केरकर यांनी आज मंत्र्यांची भेट घेऊन जलमसुद्याला अभियानातर्फे दुरुस्ती आणि सूचना सादर केल्या. राज्याचे जलधोरण हे गोव्याच्या वर्तमान आणि भविष्यासाठी महत्त्वाचे असून ते जनतेपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने नदी, नाले, तलाव, झरी यांचे अस्तित्व अबाधित राहणे महत्त्वाचे असल्याचे सौ. सावंत यांनी मंत्र्यांना सांगितले. गोवा सरकारने गेल्या महिन्यात खुला केलेला मसूदा इंग्रजीत होता. तो स्थानिक भाषेत करण्याची व जनतेपर्यंत पोचवण्याची पंचायत, नगरपालिकेमार्फत पोचावा यासाठी अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार कामत यांनी सूचना केली होती. राज्यातील विविध समाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, पंचायती, पालिका यांनी हा मसूदा अभ्यासून आवश्यक सूचना करताना जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.