मृत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाविद्यालयासमोर आंदोलन
By admin | Published: February 9, 2016 12:18 AM2016-02-09T00:18:13+5:302016-02-09T00:18:13+5:30
पुणे: विद्यार्थ्यांच्या मुरूड जंजिरा येथील सहलीदरम्यानच्या दुर्घटना प्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे पदाधिकारी तसेच सहलीशी संबंधित अधिकारी, शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी काहीवेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना संस्थेने प्रत्येकी ५० लाख व सरकारने २५ लाख रूपये मदत द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
Next
प णे: विद्यार्थ्यांच्या मुरूड जंजिरा येथील सहलीदरम्यानच्या दुर्घटना प्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे पदाधिकारी तसेच सहलीशी संबंधित अधिकारी, शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी काहीवेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना संस्थेने प्रत्येकी ५० लाख व सरकारने २५ लाख रूपये मदत द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. मागील चार दिवसांपासून संघटनेचे अध्यक्ष मतीन मुजावर महाविद्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. काही संघटनांचे प्रतिनिधी आज त्यांच्यासमवेत सहभागी झाले. त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना आंदोलनाची पुर्वपरवानगी घेतली नाही म्हणून हटकले, मात्र त्यांचे म्हणणे न ऐकले नाही. घोषणा देणे सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व नंतर समज देऊन सोडून दिले. आम्ही परवानगी मागितली होती, तसेच पत्रही पोलिसांना दिले होते, मात्र परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्यक्षात हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न संस्थेकडून होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)