नूतन महाविद्यालयात नॅक कमिटीची भेट
By admin | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:25+5:302016-02-23T00:03:25+5:30
जळगाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आहे.
Next
ज गाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आहे.महाविद्यालयात सकाळी तीन सदस्यीय नॅक समितीचे चेअरमन डॉ संतोष कुमार (भोपाळ), सहकारी सदस्य डॉ. के. के. बजाज (छत्तीसगड), सदस्य डॉ. पी.सी.चौधरी (दुर्ग) दाखल झाले यावेळी त्यांचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी स्वागत केले.समितीने सकाळी ११वाजेपासून महाविद्यलयांतील २२ विविध शैक्षणिक विभागांना भेटी दिल्या. सायंकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांचा नॅक समितीचे सदस्य व प्राचार्य, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समितीतर्फे मंगळवारी महाविद्यालयाच्या उर्दू विभाग, भूगोल, रिडींग रुम, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी कल्याण विभाग, वाचनालय, कॅन्टीन, वर्ग व स्टाफ रुम, महाविद्यालयचे काही कागदपत्र, उद्यान यासह विविध विभागांची पहाणी दिवसभर करण्यात येणार आहे. समिती योणार असल्याने महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये आकर्षक सजावट,रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने गेल्या काही दिवसापासून महाविद्यालयाची रंग रेगोटी करण्यात आली होती.