नार पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव चा समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:43 PM2019-06-28T14:43:03+5:302019-06-28T14:51:18+5:30

नांदगाव: नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.

 Nandgaon demand for inclusion of Nara Par River Jodak project | नार पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव चा समावेश करण्याची मागणी

नार पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव चा समावेश करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला प्रशासनाने य

नांदगाव:
नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला प्रशासनाने योग्य दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला निवासी नायब तहसीलदार आर एम मरकड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले अशोक परदेशी,विशाल वडघुले,योगेश सोनार,परशराम शिंदे,नवनाथ साळुंके,निवृत्ती खालकर,निलेश चव्हाण,दिलीप निकम,शिवाजी जाधव,सुमित सोनवणे, रणजित आहिरे, पुंडलिक कचरे, योगेश बोदडे,सुरेशदंडगव्हाळ,भास्कर पवार,चंद्रभान वाघ,शेख युसूफ शेख यासिन भाऊसाहेब सरोदे,वसंत मोरे ,इत्यादी आजच्या आंदोलनात सहभागी झाले नारपार जलहक्क समतिी,मनमाड बचाव कृती समतिी,मनसे,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आप पार्टी,युवा फाउंडेशन,भारिप,कोळी महासंघ इत्यादी पक्ष संघटनांच्या पदाधिकार्यांनी आजच्या धरणे आंदोलनात आपला सहभाग दिला

 
 -

Web Title:  Nandgaon demand for inclusion of Nara Par River Jodak project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.