एमपीएसची कामे करा आधिका-यांना सुचना
By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणा-या मंत्रालयीन विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळसेवा भरतीच्या परीक्षांच्या कामासाठी नियुक्त केलेले शासन सेवेतील अधिकारी परीक्षांचे काम करण्यास नकार देत असल्याचे तसेच विहित कालावधीत काम पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिका-यांनी कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ करू नये,असा फतवा राज्य शासनाने काढला आहे.
Next
प णे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणा-या मंत्रालयीन विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळसेवा भरतीच्या परीक्षांच्या कामासाठी नियुक्त केलेले शासन सेवेतील अधिकारी परीक्षांचे काम करण्यास नकार देत असल्याचे तसेच विहित कालावधीत काम पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिका-यांनी कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ करू नये,असा फतवा राज्य शासनाने काढला आहे.एमपीएससीतर्फे मंत्रालय विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळ सेवा प्रवेशोत्तर विभागीय परीक्षांसाठी शासन सेवेतील अधिका-यांची परीक्षक,नियामक व तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र,नियुक्त केलेले काही अधिकारी परीक्षेचे कामकाज नाकारत असल्याचे एमपीएससीने शासनाच्या निदर्शनास आणले आहे.अधिकारी वेळेत काम पूर्ण करत नसल्याने परीक्षापूर्व कामास विलंब होत आहे.त्यामुळे संबंधित अधिका-यांनी परीक्षेचे कामकाज विहित कालावधीत दर्जा राखून पूर्ण करावे,असा अध्यादेश शासनाने प्रसिध्द केला आहे.दरम्यान एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन.मोरे यांची याबाबत संवाद साधला असता याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.--------------------