आता परीक्षांसाठी आयसोलेटेड क्लासचा फंडा
By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30
पुणे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
Next
प णे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.सध्या सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार समोर आले आहेत. तसेच व्हॉटसअपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांकडे पत्रकारांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले असता यापुढील परीक्षा आयसोलेटेड रूममध्ये घेण्याचा विचार असल्याचे तावडे म्हणाले. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल व इतर साधने नेण्यास बंदी असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून फोडल्या जात नाहीत. प्रश्नपत्रिका फुटणे हा सामाजिक कलंक असून एक दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार बंद झाले असले तरी प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला असे प्रकार समोर येतात. विद्यार्थी वगळून इतर घटकांकडून हे प्रकार घडत असल्याने ज्या ठिकाणी मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये परीक्षा घेण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शाळेशेजारी लग्न किंवा अन्य समारंभांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. मंडळाच्या उत्तरपत्रिका सुरक्षितरित्या बोर्डापयंर्त पोहोचवणे आवश्यक असले, तरीही प्रत्येक शाळेला किंवा शिक्षकांना गाडी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेत एकही उत्तरपत्रिका गहाळ होणार नाही, हे पाहणे संबंधित शिक्षक व कर्मचार्यांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. --------चौकटशिक्षण मंडळांकडेच राहणार अधिकार?शिक्षण हक्क कायद्यानुसार महापालिकांच्या शिक्षण मंडळांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. हे अधिकार आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत. याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी शिक्षण मंडळाला अधिकार देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. याबाबत तावडे हे सुरूवातीपासून आग्रही होते. त्यामुळे मंडळांना अधिकार परत मिळतील, असेच संकेत त्यांनी यावेळी दिले.------------