एनटीपीसीची बैठक फिसकटली
By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:08+5:302015-09-04T22:45:08+5:30
सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े
स लापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना खूप काही दिले आहे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार काही प्रमाणात आणखी काही मागण्यांबाबत विचार सुरू आहे मात्र अवास्तव्य मागण्या असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे मान्य करीत नाहीत़यापूर्वी पॅकेज दिले आहे मात्र आता प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना 12़5 टक्के विकसित जमिनीऐवजी प्रतिएकरी 5 लाख द्या, सानुग्रह अनुदान प्रती निधी 3़25 लाख द्या, 100 कोटी बँकेत ठेव ठेवून त्याचे व्याज शेतकर्यांना द्या, कुटुंबातील सर्वांना 2 लाखांची मुदत ठेव, शेतमजुरांना 50 ऐवजी 1 लाख देणे, गावच्या विकासासाठी प्रती गाव पाच कोटी देणे आदी मागण्या शेतकर्यांच्या आहेत़