उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2016 06:31 PM2016-05-29T18:31:15+5:302016-05-29T18:31:15+5:30
या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियां
Next
य कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल, त्यांनी आतापासूनच एमएच-सीईटी, जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी केली पाहिजे. ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या माध्यमातून पुढे करिअरच्या असंख्य वाटा आहेत. आयआयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा, एसएटी-एमसीएटी (या प्रवेश परीक्षा देऊन विदेशात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करता येते), स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये १० वीनंतर उत्तम संधी असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.पूरक व्यवस्था असल्याशिवाय करिअरचा मार्ग बदलू नकाअनेक जण १० वी किंवा १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळतात. मात्र, हे क्षेत्र प्रचंड आव्हानात्मक आहे. दीर्घकाळ संघर्ष व मेहनत घेतल्यानंतरही या क्षेत्रात पदरी अपयश येते. अशा वेळी खूप वेळ निघून जाते. त्यामुळे पूरक व्यवस्था असल्याशिवाय कधीही करिअरचा मार्ग बदलू नये. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर चालावे. दुर्दैवाने या मार्गावर चालताना अपयश आले तरी आधी घेतलेल्या शिक्षणामुळे नोकरी मिळवता येते, असा मौलिक सल्ला संदीप पाटील यांनी कार्यशाळेत दिला.या कार्यक्रमासाठी अक्षय पवार, पंकज पाटील, चेतन जाधव, चेतना बर्हाटे, विनोद शिरसाठ, पूनम पाटील यांच्यासह विवेकानंद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.