भावनिक एकात्मतेतूनच साधेल राष्ट्रीय एकात्मता संयुक्त निबंध स्पर्धेत महाराष्ट्र गुजरातचे १ हजार विद्यार्थी
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30
पुणे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्या संयुक्त हिंदी निबंध स्पर्धेत यंदा १ हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
Next
प णे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्या संयुक्त हिंदी निबंध स्पर्धेत यंदा १ हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.निबंध स्पर्धा गुजरात व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व एकांकिका तसेच वक्तृत्व वगैरे स्पर्धा राज्यासाठी याप्रकारे गत ५१ वर्षे सभा हिंदी भाषा प्रसारासाठी प्रयत्नशील आहे. नुकताच या स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसिद्ध नाट्यसमीक्षक वि. भा. देशपांडे व माजी आमदार उल्हास पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या दोन्ही वक्त्यांनीही सभेच्या या उपक्रमाचे खास कौतुक केले.अशा प्रकारच्या स्पर्धांमधून भावनिक एकात्मता साधली जाते. राष्ट्रगीत तसेच समुहगीत गायनाच्या स्पर्धाही याचसाठी विविध ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता साधेल असे उल्हास पवार यांनी सांगितले. देशपांडे म्हणाले, ' सर्व थोर व्यक्तींचे व्यक्तिमत्व शालेय जीवनातच घडले आहे. वाचनातून, स्पर्धांमधील सहभागातून त्यांनी स्वत:ला घडवले. स्पर्धांमुळे शालेय जीवनातच चांगले संस्कार होतात, तेच पुढे उपयोगी पडतात'संस्थेचे सचिव शं. आ. जगताप यांनी प्रास्तविक केले. कार्याध्यक्ष डॉ. वीणा मनचंदा यांनी संस्थेची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पवार व देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. वंदना ठकार यांनी सुत्रसंचालन केले. सुनेत्रा गोंदकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)