विद्यापीठ उत्तरपत्रिका तपासणार ऑनलाईन कुलगुरू : यंदा एम.ई.,एम.एड.च्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणार
By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:27+5:302015-03-14T23:45:27+5:30
पुणे : परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर व्हावेत यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला असून, यंदा प्रथमत: अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे केले जाणार आहे, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत केली.
Next
प णे : परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर व्हावेत यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला असून, यंदा प्रथमत: अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे केले जाणार आहे, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत केली. विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी अहवाल सादर करताना परीक्षा विभागाच्या ऑटोमेशनच्या कामाबद्दल माहिती सांगताना चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका तपासण्याबाबतची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या विविध विकासकामांची माहिती दिली.गाडे म्हणाले, की परीक्षा विभाग, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, वित्त व लेखा विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे बर्यापैकी ऑटोमेशनचे काम झाले आहे. त्यामुळे एम.ई. आणि एम. एड. या अभ्यासक्रमाच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासल्या जाणार आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम यामुळे सोपे होणार आहे. परिणामी, ज्या दिवशी उत्तरपत्रिका तपासल्या जातील त्याच दिवशी निकाल जाहीर करणे शक्य होणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सर्व विद्याशाखांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासणीचे काम केले जाणार आहे.विद्यापीठाने ऑटोमेशनमध्ये प्रगती केली असून, त्याची नोंद भारत सरकारने घतली आहे. केंद्राच्या वित्त विभागाने नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीने आवश्यक असलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा विकसित करण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सोपविले आहे.