उमवित कार्यशाळा

By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:39+5:302016-02-02T00:15:39+5:30

जळगाव : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम आणि व्यवस्थापकीय प्रणालीबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३० जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक व त्यांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली.

Outstanding Workshop | उमवित कार्यशाळा

उमवित कार्यशाळा

googlenewsNext
गाव : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम आणि व्यवस्थापकीय प्रणालीबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३० जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक व त्यांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली.
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे उच्च शिक्षण सर्वेक्षण व व्यवस्थापकीय माहिती प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक माहिती भरुन संबंधित वेब पोर्टलवर निर्धारित कालावधीत माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात बीसीयुडी संचालक प्रा. डी. जी. हुंडीवाले, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत १०७ महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राम भावसार यांनी केले. रश्मीकांत जाधव यांनी पॉवर पॉइंर्टद्वारे सादरीकरण केले. उपकुलसचिव जी.एन.पवार व संगणक केंद्र प्रमुख विनोद पाटील यांनी या कार्यशाळेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

Web Title: Outstanding Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.