१५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज
By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:50+5:302016-02-02T00:15:50+5:30
जळगाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे.
ज गाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे. १७ ते २३ जानेवारी दरम्यान या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. टुडीप टेक्नोलॉजी, पुणे, फेअर डिल पॉवर, परवानु, ॲक्मे सुजान केमिकल्स, बीडीएस टेक्नोलॉजी ॲण्ड सोल्युशन्स, कॅपजेमिनी, विघ्न हर्ता ऑटोमेशन ॲण्ड सिक्युरिटीज, ॲक्सीक बॅँक या कंपन्यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विश्वस्त रावसाहेब शेखावत, डॉ. आर.एच. गुप्ता, संचालक तथा वास्तुविशारद शशिकांत कुलकर्णी, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, प्रा. डॉ. एस. आर. सुरळकर, डॉ. एस. ए. ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी : टुडिप टेक्नोलॉजी, पुणे (पॅकेज २ लाख ४ हजार) : भाग्येश पाटील, सागर राजकुले (आय.टी.), गौरव देशमुख, विलोक शाह, विशाल मिस्किल (संगणक शाखा), बीडीएस टेक्नोलॉजी ॲण्ड सोल्युशन, मोहाली (पॅकेज २.४ लाख) : ऋतुजा मेश्राम, सायली पाटील, संस्कृती बोरसे, अजिज भार्मल (ई ॲण्ड टीसी), केतन दुसाने (इलेक्ट्रीकल), फेअरडिल पॉवर (२.४ लाख) : अश्विनी बागुल , अभिलाष साळुंखे, लेखा ढोले, विनय पवार, मोहीत पाटील, (इलेक्ट्रीकल विभाग), कॅपजेमिनी, मुंबई : अमोल नांद्रे, अमेय नेवे (मेकॅनिकल), रेणुका लिंगायत (संगणक), अजिज भार्मलॲक्मे सुजान : हर्षल ठाकूर व पवन जाधव