पान 5 : गोपाल थिरकले बॉलीवूड संगीताच्या तालावर
By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:34+5:302015-09-07T23:27:34+5:30
- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी साजरा केला गोपालकाला
Next
- हाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी साजरा केला गोपालकालापणजी : राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये डिजे व बॉलिवूड संगीताच्या तालावर थिरकत सोमवारी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जन्माष्टमी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली. या वेळी गोपाळच नव्हे तर मॉडर्न गोपिकासुध्दा दहीहंडी फोडताना दिसल्या. ‘गोविंदा रे गोपाळा’ तसेच इतर पारंपरिक गाण्यांची जागा डिजे संगीताने घेतल्याचे चित्र महाविद्यालयांमध्ये दिसले. एकमेकांना पाण्याने चिंब भिजवून नाचत-गात महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी गोपालकाल्याचा हा उत्सव एन्जॉय केला. दहीहंडीच्या निमित्त या वेळी विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. यात नृत्य स्पर्धा, मनोरंजन, गीत गायन, हंडी पेण्टींग, रांगोळी, नारळ फोडण्याची व टी-शर्ट पेण्टींग स्पर्धांचा समावेश होता. तर गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस आवारात झाडाला दहीहंडी लटकवून एकमेकांवर चढून दही हंडी फोडण्याचा आनंद लुटला. या वेळी एकमेकांना भिजवण्यासाठी खास टॅँकरच्या पाण्याची सोय केली होती. विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गाला दांडी मारून दहीहंडीचा आनंद घेताना दिसत होते. (प्रतिनिधी)बॉक्स- ‘हम किसीसे कम नही’मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनींनी दहीहंडी फोडून हम भी किसीसे कम नहीं हे सिध्द करून दाखवले. या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अफगाणी गोपाळांनी अफगाणिस्तानचे नृत्य सादर करून मनोरंजनात भर घातली.