चित्रकला व विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By Admin | Published: February 2, 2016 12:16 AM2016-02-02T00:16:11+5:302016-02-02T00:16:11+5:30

The painting and science exhibition concludes | चित्रकला व विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

चित्रकला व विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

googlenewsNext
> जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला.
आर. आर. विद्यालयात समारोपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. एस. सरोदे यांनी केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष दिलीप लाठी, सचिव मुकुंद लाठी, सदस्य घन:श्याम लाठी, अविनाश लाठी, विजय लाठी, एम. के. कासट, सदस्या प्रतिभा पाटील, प्राचार्य पंकज कुलकर्णी, मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे, प्राचार्य सोनाली रेंभोटकर उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन बी. एन. पानपाटील यांनी, तर आभार पी. आर. श्रावगी यांनी मानले.

विजेत्या स्पर्धकांची नावे अशी :


विज्ञान प्रदर्शन (गट क्रमांक १) : प्रथम- संकेत कोठवदे, उत्क र्ष इंगळे (ए.बी. बॉईज हायस्कूल, चाळीसगाव), द्वितीय- साक्षी पाटील व पूर्वा तिवारी (न्यू इंग्लिश स्कूल, जळगाव), तृतीय- सौरभ देसले (जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल)
गट क्रमांक : २ : प्रथम सौरभ पाटील, रजनीकांत पाटील (आर. आर. विद्यालय, जळगाव), द्वितीय- राधेश्याम नेमाडे (ए. टी. झांबरे विद्यालय), तृतीय- मोहीत पाटील, नीलेश पाटील (आर. आर. विद्यालय),
सायबर क्राईम विषयासाठी : ऋतुजा सुलक्षणे, खुशबू ठाकरे यांना पारितोषिक मिळाले.


Web Title: The painting and science exhibition concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.