पान १ - मुंबई/पुणे
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:40+5:302015-07-10T23:13:40+5:30
ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना
Next
ऑ लाईनच्या विद्यार्थ्यांनाऑफलाईनचा पर्याय !- शिक्षण विभागाने नियम रद्द केलामुंबई : ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील आता ऑफलाईन प्रक्रियेत सहभागी होता येईल. यासंदर्भात मनाई आदेश शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे टष्ट्वीट शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.यासंदर्भात मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे म्हणाले की, नियमानुसार अकरावी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नव्हते. त्यासाठी प्रवेश रद्द करणार्या कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमागे शिक्का मारण्याचे आदेशही दिले होते. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी न झालेले आणि त्यापासून वंचित राहिलेले अशाच विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या नियमात बदल करून आता सरसकट सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने कळवली. -----ऑफलाईनचे वेळापत्रक -- कनिष्ठ महाविद्यालयाने रिक्त जागांची माहिती शनिवारी, ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.- शाळा सोडल्याचा मूळ दाखला व गुणपत्रिका आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज द्यावे.- प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन १३ ते १५ जुलैदरम्यान करावे.- शाखानिहाय गुणवत्ता यादी १६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल.- यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि १७ जुलैला प्रवेश घ्यावेत.- १८ जुलैला रिक्त जागांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा.-------(मुंबई-पुण्याने यासंबंधीची माहिती या बातमीला जोडून घ्यावी)