कंचन सुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

By Admin | Published: December 14, 2015 07:12 PM2015-12-14T19:12:00+5:302015-12-14T19:12:00+5:30

येवला : कंचनसुधा ?कॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्यांचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने प्राथमिक विभागातील मयुरी भांडे हिने कृष्णा पुन्हा अवतार घे! ही कविता प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर श्रावणी गुब्बी हिने इंग्लिश कथा कथन, आदिती पायमोडे हिने इंग्लिशमध्ये १२ ते १५ पाढे म्हटले, तनुष्का वाटाणे हिने इंग्लिश कविता, श्रेया गांगुर्डे हिने मराठीतून गोष्टी सादर केल्या. पूर्व प्राथमिक विभागातुन स्पंदन शिंदे याने इंग्रजीतुन गोष्ट, गुजन आहिरे हिने स्वत:ची माहिती, मयंक झाल्टेने इंग्रजीतुन परिपाठ सादर केला.

Parents day celebrated in Kanchan Sudha English Medium School with enthusiasm | कंचन सुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

कंचन सुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा

googlenewsNext
वला : कंचनसुधा ?कॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला-कौशल्यांचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने प्राथमिक विभागातील मयुरी भांडे हिने कृष्णा पुन्हा अवतार घे! ही कविता प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर श्रावणी गुब्बी हिने इंग्लिश कथा कथन, आदिती पायमोडे हिने इंग्लिशमध्ये १२ ते १५ पाढे म्हटले, तनुष्का वाटाणे हिने इंग्लिश कविता, श्रेया गांगुर्डे हिने मराठीतून गोष्टी सादर केल्या. पूर्व प्राथमिक विभागातुन स्पंदन शिंदे याने इंग्रजीतुन गोष्ट, गुजन आहिरे हिने स्वत:ची माहिती, मयंक झाल्टेने इंग्रजीतुन परिपाठ सादर केला.
पियुष म्हस्के व साई कडू यांनी हामार्ेनिअम वादनात राग काफी सादर केला. त्यांना तबल्याची साथ संगत प्रसाद सोनवणे याने केली. इ. ५ वी तील विद्यार्थींनी सिया भालाधरे, प्रितेश जमधडे, हरिओम होलीवाले, कल्याणसिंग राजपुरोहित यांनी राग भुपालीचे सादरीकरण केले.
कार्यक्र माची सुरु वात जेष्ठ पालकांच्या हस्ते करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष अजय जैन आणि प्राचार्य दवंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरु वातीला सरस्वती पुजन होऊन,स्वागतगीताचे सादरीकरण झाले. कार्यक्र माचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक निकम यांनी केले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन संगीत शिक्षक भावसार यांनी केले. चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन कलाशियक भड यांनी केले. प्राचार्य दवंगे यांनी पालकांचे शंका निरसन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष अजय जैन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे आभार मोनालिसा शेलार यांनी मानले. कार्यक्र मास शाळेच्या सचिव रचना जैन ,धिवर, सबनीस, भोरकडे, असलकर, डॉ. कांबळे, पायमोडे, बच्छाव, पावटेकर, बेडके, गुब्बी,सह पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: Parents day celebrated in Kanchan Sudha English Medium School with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.