्रगरीब उपवरांनाही लाभणार आयुष्याचा जोडीदार (भाग १)
By Admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:08+5:302015-02-21T00:50:08+5:30
- मैत्री परिवार संस्था : विष्णुजी की रसोईचा उपक्रम
- ैत्री परिवार संस्था : विष्णुजी की रसोईचा उपक्रम नागपूर : भारतीय परंपरेत विवाहाचा विधी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची पद्धत आहे. आयुष्याचे महत्त्वाचे वळण आनंदी करण्याचाच उद्देश त्यामागे असला तरी बदलत्या काळात प्रत्येकाला हा सोहळा आर्थिकदृष्ट्या पेलवणारा नसतो. अत्यंत कमी खर्चातही विवाह करणे अनेक गरीब गरजू उपवर-वधूंना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण त्यांना बरेचदा अनुभवता येत नाही. यासाठी मैत्री परिवार संस्था आणि विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक महाविवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळ २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बजाजनगरच्या वासवी लॉनमध्ये होणार असल्याची माहिती मैत्री परिवार संस्थेचे प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महाविवाह सोहळ्यात एकूण ४४ उपवर-वधूंचा विवाह करण्यात येणार आहे. हा सोहळा यशस्वी आणि आनंदी करण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून तयारी सुरू आहे. सोहळ्यात विवाह होणाऱ्या वधू- वरांची नावे निवृत्त पोलीस अधिकारी अनिल बोबडे आणि मैत्री परिवाराच्या महिला कार्यकर्त्यांनी वधू - वरांच्या मुलाखती घेऊन निवडली. विवाहापासून वंचित असलेल्या ४० जोडप्यांचे विवाह लावूनच आपल्या लग्नाची चाळिशी साजरी करावी, असा विचार एका सहृदाच्या मनात आल्यानंतर त्यांनी मैत्री परिवार संस्थेशी संपर्क साधला आणि हा महाविवाह सोहळा आकाराला आला. महाविवाह सोहळ्यात सर्व धर्म, समाजाच्या रीती, नियम पाळून लग्न लावण्यात येणार आहेत. महाविवाह सोहळ्यात ८० टक्के आंतरजातीय विवाह होणार असून सर्वांची नावे रजिस्ट्रारकडे नोंदवून प्रमाणपत्र देण्यात येतील. सोहळ्यात वर-वधूकडील प्रत्येकी १५ जणांना पासेस देऊन बोलविण्यात येईल. ५ जोडप्यांचा ग्रुप करून लग्न लावण्यात येईल. बाहेरगावावरून येणाऱ्या जोडप्यांची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. केवळ आर्थिक पातळीवर विवाह अडतात अशांचे विवाह लावून देणे एवढाच या महाविवाह सोहळ्याचा उद्देश नाही तर विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचे संसार नीट चालावेत यासाठी या जोडप्यांना ६ व्यक्तीच्या कुटुंबाला लागतील एवढी भांडी, संसारोपयोगी वस्तू आणि त्यांच्या नावाने १० हजार रुपये बँकेत डिपॉझिट करण्यात येणार आहेत.