पंतप्रधानांची ‘मन की बात’ शाळाशाळांमधून
By admin | Published: September 5, 2015 01:37 AM2015-09-05T01:37:20+5:302015-09-05T21:47:09+5:30
सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संदेशाने भारावून जात विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवादाला टाळ्यांनी दाद दिली़
सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संदेशाने भारावून जात विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवादाला टाळ्यांनी दाद दिली़
दयानंद काशिनाथ आसावा प्रशाला
दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत जिल्?ाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत ऐकली़ शाळेत मोठय़ा स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती़ दरम्यान, महत्त्वाच्या मुद्यांवर पालकमंत्र्यांची छबी खुलत अस़े त्यांच्या चेहर्यावरील हावभाव विद्यार्थी मन की बात ऐकता ऐकता टिपत असत़ संपूर्ण कार्यक्रम पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमवेत ऐकला़ मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केल़े यावेळी पर्यवेक्षक चारुशीला बेंबळकर, रुद्रय्या हिरेमठ, अरुणा कुलकर्णी, सलीम बेग, संतोष हंपे आदींनी पर्शिम घेतल़े
मनपा मुलींची शाळा क्र.5
पांढरे वस्तीमधील मनपा मुलींची शाळा क्र ़5 मध्ये शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणाचे दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आल़े यावेळी मुख्याध्यापक अमोल भोसले, किरण शेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती़ माऊंट एव्हरेस्टवर चढणारी मुले, खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारी मुले यांची क्लिप पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली़
युनियन एज्युकेशन सोसायटी
युनियन एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद रेडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर दाखवण्यात आला़ शिक्षक, पाल्यांबरोबर पालकांनीही यावेळी हजेरी लावली होती़
राजेभाई उर्दू स्कूल
संत तुकाराम नगरातील राजेभाई उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिभाषण दाखवण्यात आल़े यावेळी मुख्याध्यापिका सबीहा पीरजादे आणि शिक्षक-पालक उपस्थित होत़े
संभाजीराव शिंदे प्रशाला
विडी घरकूलमधील संभाजीराव शिंदे प्रशालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद ‘मन की बात’चे टीव्हीवरील प्रक्षेपणाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला़ यावेळी मुख्याध्यापिका इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी प्रोजेक्टरद्वारे पंतप्रधानांचे अभिभाषण दाखवण्यात आल़े 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रक्षेपणाचा लाभ घेतला़ यावेळी पर्यवेक्षिका भोसले, ढोपरे, दुध्याल आदी उपस्थित होत़े
सुरवसे प्रशाला
आसरा चौकातील सुरवसे प्रशालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणाचे टीव्हीवरून प्रक्षेपण करण्यात आल़े 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी या अभिभाषणाचा लाभ घेतला़ मुख्याध्यापिका दीपिका इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती़