पोस्ट गावगिरी
By Admin | Published: July 30, 2015 11:14 PM2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30
पोस्ट गावगिरी, डिचोली
प स्ट गावगिरी, डिचोलीधडा एका प्राथमिक शाळेचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. ग्रामपंचायत विषयावर पाठय़पुस्तकात धडा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पंचायतीचा कारभार कसा चालतो, सरपंचाची कामे कोणती, सचिव तसेच इतर पंचमंडळाच्या कामासंबंधी गुरुजी मुलांना माहिती देऊ लागले. सरपंचाचे काम कोणते, असा प्रश्न विचारताच एक पंच म्हणाला, याचे उत्तर सरपंचांनाच देऊ द्या. सरपंच उठून उभे राहिले आणि म्हणाले, ‘हे पळयात- सरपंचाक खूप कामा आसता. गावांत जर कोणी मेलो तर तेणी सरपंचाक ताबडतोब येवन मेळोंक जाय, तशेंच कोणुय जन्माक येयलो तर तेणीय सरपंचाक ताबडतोब मेळपाक जाय.’ सर्व जण अवाक् होऊन हे ऐकतच राहिले. मेलेला माणूस सरपंचांना कसा भेटू शकेल आणि जन्माला आलेले मूल तरी सरपंचांना लगेच कसे भेटू शकेल. याविषयी मग त्या गुरुजींनीच मुलांना समजावून सांगितले की, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणे हे पंचायतीचे काम असते. या सर्व प्रश्नोत्तरित आपल्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला न्यायला आलेल्या एका नागरिकाच्या मनात मात्र आपण दाखला न्यायला उशिरा तर आलो नाही ना, अशी शंका येऊन गेली.- दुर्गादास गर्दे