प्रज्ञा - शंकरराव बुे -ााटील यांचे कार्य प्रेरणादायी शरद बुे-पाटील : पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By Admin | Published: August 7, 2015 09:35 PM2015-08-07T21:35:33+5:302015-08-07T21:35:33+5:30
लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बुे-पाटील यांनी केले.
ल ण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बुे-पाटील यांनी केले.जुन्नर येथे जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुे-पाटील विद्यालयात (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात शरद बुे-पाटील बोलत होते. या वेळी मुख्याध्यापक विलास पानसरे यांनी (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांनी शिक्षणप्रसारासाठी केलेल्या कार्याची व त्यांच्या जीवनातील अनेकविध पैलूंची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी (गाजरे), कार्याध्यक्ष माजी आमदार दिलीप ढमढेरे, उपाध्यक्ष संजय बुे-पाटील, सचिव विजय ताथेड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुे-पाटील, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास टाकळकर, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष संभाजी बुे-पाटील, संचालक रमेश खत्री, संजय मुथा, सुहास भगत, विश्वस्त अप्पासाहेब बुे-पाटील, शरद बुे-पाटील, प्रल्हाद बुे-पाटील, घनश्याम बुे-पाटील, माजी विद्यार्थी संघाचे कार्याध्यक्ष प्रताप गोरे, जयवंत बुे-पाटील, उपमुख्याध्यापक संजय जोशी, पर्यवेक्षिका मीरा थोरात, शिक्षक प्रतिनिधी सर्जेराव साबळे उपस्थित होते. विशाखा बोचरे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका संगीता काळे यांनी आभार मानले.फोटोखाली मजकूर : (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुन्नर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शरद बुे-पाटील. ०००००