प्रज्ञा - भोलावडे शाळेत सायकलवाटप
By admin | Published: August 19, 2015 10:27 PM2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
भोर : भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दळणवळणाची सोय नाही. अशी मुले शाळेपासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात येते. याचा लाभ अधिकाधिक शाळांनी घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती वंदना धुमाळ यांनी केले.
Next
भ र : भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दळणवळणाची सोय नाही. अशी मुले शाळेपासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात येते. याचा लाभ अधिकाधिक शाळांनी घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती वंदना धुमाळ यांनी केले.भोलावडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तालुक्यातील प्राथमिक शाळेतील मुलांना सायकलचे वाटप धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गटशिक्षणाधिकारी महाजन, सहायक गटविकास अधिकारी साळवे, सर्जेराव पडवळ, कांता खोपडे, केंद्रप्रमुख उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील अंगणवाड्यांना कुकरचे वाटपही करण्यात आले. फोटो : महिला व बाल कल्याण सभापती वंदना धुमाळ मुलांना सायकलींचे वाटप करताना.०००