प्रज्ञा - देशात वीस हजार शौचालये बांधणार
By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:34+5:302015-08-03T22:26:34+5:30
के.आर.रंविद्रन : आंबी येथील कामाची पाहणी, विविध सेवांचे लोकार्पण
Next
क .आर.रंविद्रन : आंबी येथील कामाची पाहणी, विविध सेवांचे लोकार्पण मार्गासनी : रोटरी क्लबकडून संपूर्ण देशात वीस हजार शौचालये बांधणार असल्याचे रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रविंद्रन यांनी सागितले. हवेली तालुका आणि वेल्हे तालुक्याच्या हद्दीवर असलेले आंबी येथील विविध सेवा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रविंद्रन बोलत होते. पानशेत येथील जनसेवा फाऊडेशन व रोटरी क्लब पिंपरी यांच्या सयुक्त विद्यमाने आंबी येथील २०४ लोकांना मोफत स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहेत. या परिसरातील सोनापूर, रुळे, पानशेत, आंबी येथील विद्यालयातील मुलींसाठी बारा स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रविंद्रन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब ३१३१ कडून ५० मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना दप्तर, कपडे, टॉवेल, शालोपयोगी साहित्य मोफत देण्यात आले. रोटरी मिटकॉनकडून २०० महिलांची स्तनतपासणी करण्यात आली. रोटरी क्लब पिंपरी व जनेसवा फाऊंडेशनकडून ५६ रुग्णांची व ८ कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पानशेत येथील वीर बाजी पासलकर विद्यालयात मुलींसाठी सहा स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. रविंद्रन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे संचालक मनोज देसाई, डीस्ट्रीक्ट गर्व्हनर सुबोध जोशी, रोटरी क्लबचे पिंपरीचे अध्यक्ष सदानंद नायक, जनसेवा फाऊंडेशनचे विनोद शहा, मीना शहा, प्राध्यापक जे.पी.देसाई, टीएसआर मुर्ती, कृष्णकांत जाधव, आणि वेठफिल्ट फांऊडेशनचे उद्योग समुहाचे डायरेक्टर अश्विन मल्होत्रा, मुकेश मल्होत्रा, जनसेवा फाऊंडेशनचे सुनिल कटारीया, अकुंश पासलकर आदिसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.फोटोसाठी ओळ : पानशेतमधील वीर बाजी पासलकर विद्यालयात मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करताना रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रंविद्रन व इतर