जैन कासार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By admin | Published: September 3, 2015 11:52 PM2015-09-03T23:52:53+5:302015-09-03T23:52:53+5:30
सोलापूर : जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आदर्श मातांचा गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अँड.अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित राहणार आहेत. रामतीर्थकर यांचे ‘आई’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुभाषचंद्र वनुकद्रे असणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष संजय कंदले यांनी पत्रकार परिषदेत दिली़
Next
स लापूर : जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आदर्श मातांचा गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अँड.अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित राहणार आहेत. रामतीर्थकर यांचे ‘आई’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुभाषचंद्र वनुकद्रे असणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष संजय कंदले यांनी पत्रकार परिषदेत दिली़जैन कासार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वधू-वर मेळावे, सामुदायिक विवाह आदी कार्यक्रम प्रतिष्ठानने यापूर्वी राबविले आहेत. दरवर्षीप्रमाणे दहावीत प्रथम येणार्यास स्व़ मथुराबाई हरपाळे प्रथम पारितोषिक (रु.1001), बारावीत प्रथम येणार्यास स्व़ इंदुमती टोणगे प्रथम पारितोषिक (रु. 1001), तर दहावी व बारावीत शहरातून द्वितीय येणार्यास स्व़ रत्नाबाई दुरुगकर द्वितीय पारितोषिकाने (रु.500 प्रत्येकी) सन्मानित करण्यात येणार आह़े उदगीरच्या कृष्णाबाई मांगुळकर, सोलापूरच्या लिलाबाई कंदले, सुशीलाबाई बारसकर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. तसेच चिंतामणी पार्श्वनाथ दि. जैन कासार मंदिराच्या विश्वस्तपदी सर्वर्शी संजय कंदले, रविकिरण मैंदर्गी, बाबुराव तंगा, शांतीनाथ मुलगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेस डॉ.विलास हरपाळे, विनायक टोणगे, हुकुमचंद हेसे, बाबुराव तंगा, प्रा.अजित देवसाळे उपस्थित होते.