मुलांमध्ये तरुण तर मुलींमध्ये प्रियंका अव्वल

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30

मुलांमध्ये तरुण तर मुलींमध्ये प्रियंका अव्वल

Priyanka tops among young girls | मुलांमध्ये तरुण तर मुलींमध्ये प्रियंका अव्वल

मुलांमध्ये तरुण तर मुलींमध्ये प्रियंका अव्वल

Next
लांमध्ये तरुण तर मुलींमध्ये प्रियंका अव्वल
कामठीत आयोजन : राजीव गांधी अक्षय ऊर्जादिन सद्भावना दौड
कामठी : स्थानिक नूतन सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय व नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान राजीव गांधी अक्षय ऊर्जादिन सद्भावना दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात मुलांच्या गटात तरुण वर्मा तर मुलींमध्ये प्रियंका बाहे अव्वल ठरले. दौड स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणातून राजीव गांधी सद्भावना दौड स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माजी आ. देवराव रडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून दौड स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष रणजित सफेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंत्तेवार, ठाणेदार उत्तम मुळक, जयेश भांडारकर, माजी नगराध्यक्ष माया चवरे, वीज कंपनीचे अभियंता मदने, अंकुश बावनकुळे, मुरारीलाल शर्मा, सेवानिवृत्त कर्नल वसंत बकाल, भैयालाल माकडे, कश्यप संगेवार, पंजाबराव वैद्य, शेषमल ओसवाल, शरद कारेमोरे, मुख्याध्यापक रमेश बारई, मुख्याध्यापिका एस. एम. गिरी, रमा नेहारे, पैगवार आदी उपस्थित होते.
सद्भावना दौड स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम तरुण वर्मा, द्वितीय कमलेशकुमार वंदनकुमार, तृतीय देवेंद्र बावनकुळे, प्रोत्साहनपर अरसल रहिम खान विजेते ठरले. तर मुलींच्या गटात प्रियंका बाहे (प्रथम), क्षमा कुरेशी (द्वितीय), त्रिवेणी नागपुरे (तृतीय) खुशबू कुरील (प्रोत्साहनपर) पुरस्काराचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका शीला गिरी यांनी केले. संचालन प्रकाश सातपुते यांनी तर आभार दिनेश चौकसे यांनी मानले. दौड स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन रडके, डॉ. विजय रडके, सुहासिनी रडके, माधव डंभारे, पुंडलिक मोरे, सुषमा राखडे, शंकर भुजाडे, मन्ने, वसंत खुरगे, जयपाल बारसागडे, अजमल आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Priyanka tops among young girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.