पुणे विभागीय मंडळाला मिळाले सचिव
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:14+5:302016-10-30T22:47:14+5:30
पुणे: गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी अधिका-यांच्या अधिपत्या खाली सुरू असलेल्या पुणे विभागीय शिक्षण मंडळाला अखेर पूर्णवेळ सचिव मिळाले आहेत. मात्र,मंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार अद्यापही कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष व्ही.बी.पायमल यांच्याकडे आहे. दहावी,बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना मंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Next
प णे: गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी अधिका-यांच्या अधिपत्या खाली सुरू असलेल्या पुणे विभागीय शिक्षण मंडळाला अखेर पूर्णवेळ सचिव मिळाले आहेत. मात्र,मंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार अद्यापही कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष व्ही.बी.पायमल यांच्याकडे आहे. दहावी,बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना मंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील व पुणे विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांची बदली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेत (एमएससीईआयटी)करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदावर कोण रुजू होणार हे स्पष्ट करण्यात आले नव्हते.परंतु,पुष्पलता पवार यांचा कार्यभार बबन दहिफळे यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी काही दिवसांपूर्वी हा कार्यभार स्वीकारला आहे. दहिफळे यांच्या वादग्रस्त कामकाजामुळे त्यांना पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती एमएससीईआयटीमध्ये करण्यात आली होती.आता काही महिन्यातच त्यांच्याकडे पुणे विभागीय मंडळाच्या सचिव पदाची जबादारी देण्यात आली.मात्र,कृष्णकुमार पाटील यांच्या जागी अद्याप कोणाचीही बदली केलेली नाही.सध्याचे बालभारतीच्या संचालक सुनील मगर यांच्याकडे पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार होता. बालभारतीच्या संचालक पदाची धुरा स्वीकारल्यानंतर मगर यांचा प्रभारी कार्यभार व्ही.बी.पायमल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. परंतु, दहावी, बारावीच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाही पुणे विभागीय मंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.