संरक्षण दलातील खरेदीचे धोरण
By Admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:24+5:302015-05-05T01:21:24+5:30
संरक्षण साहित्य खरेदी
स रक्षण साहित्य खरेदीधोरण लवकरच : पर्रीकरपणजी : संरक्षण दलातील खरेदीसाठीचे धोरण येत्या दोन ते तीन महिन्यांत निश्चित केले जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.निर्यात, मेक इन इंडिया संकल्पना, सर्व पुरवठादारांना समान न्याय, एजंट्स, काळी यादी या पैलूंना स्पर्श करणारे असे धोरण तयार होईल. संबंधित समितीने अगोदर त्यास मान्यता द्यायला हवी. अंतिम धोरण जूनपूर्वी संरक्षण मंत्रालयासमोर येईल, असे पर्रीकर म्हणाले. संबंधित समिती धोरणाचा अभ्यास करील व पंचेचाळीस दिवसांत अहवाल देईल. समिती अंतरिम अहवालही देईल. मे आणि जूनमध्ये विविध प्रकारची प्रक्रिया निश्चित झालेली पाहायला मिळेल, असे पर्रीकर म्हणाले. धोरणातील काही अध्याय अगोदर अधिसूचित होतील, असेही त्यांनी सांगितले.सरकारने संरक्षण दलासाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या खरेदीसाठी अगोदरच मान्यता दिली आहे. यापैकी ९० टक्के व्यवहार हे मेक इन इंडिया संकल्पनेतील आहेत. संरक्षण साहित्य खरेदी हे केंद्र सरकारसाठी सर्वात मोठे पाऊल ठरेल. निर्यातीसाठी पूर्वी ना हरकत दाखला मिळण्यासाठी बराच वेळ जायचा. आता आम्ही ठरावीक कालावधीत ना हरकत दाखले देतो, असे पर्रीकर यांनी नमूद केले.दरम्यान, भारतीय हवाई दलासाठी राफेल विमान खरेदीसाठी वाटाघाटी याच महिन्यात सुरू होतील. तत्पूर्वी समिती नेमली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महिन्यात कोणत्याही क्षणी या वाटाघाटी सुरू होतील. आम्हाला त्या शक्य तेवढ्या लवकर संपवायच्या आहेत, असे पर्रीकर यांनी सांगितले. वाटाघाटींची पूर्वतयारी म्हणून येत्या ६ रोजी फ्रान्सचे संरक्षणमंत्री दिल्लीस येणार आहेत. ते वाटाघाटींची प्रक्रिया पुढे नेतील, असे पर्रीकर म्हणाले.(खास प्रतिनिधी)