कर्णिकनगर सोसायटीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:13+5:302015-08-18T21:37:13+5:30

सोलापूर: कर्णिकनगर सोसायटी ब ग्रुपमधील १२१ सभासदांना जिल्हाधिकार्‍यांनी शर्त भंग केल्याच्या अटीवर घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्यामुळे मंगळवारी सोसायटीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विमानतळावर निवेदन दिले़ आम्हाला पुरेशी संधी दिली नाही, त्यामुळे आपण आमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि २२ ऑगस्टपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ सोसायटीचे अध्यक्ष प्रा़ अशोक काजळे, आ़ सुभाष देशमुख, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्यासह सोसायटीचे सभासद यावेळी उपस्थित होते़ जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर बुधवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे़ मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही़

Request to Chief Minister of Karnikagaragar Society | कर्णिकनगर सोसायटीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कर्णिकनगर सोसायटीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next
लापूर: कर्णिकनगर सोसायटी ब ग्रुपमधील १२१ सभासदांना जिल्हाधिकार्‍यांनी शर्त भंग केल्याच्या अटीवर घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्यामुळे मंगळवारी सोसायटीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विमानतळावर निवेदन दिले़ आम्हाला पुरेशी संधी दिली नाही, त्यामुळे आपण आमचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि २२ ऑगस्टपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ सोसायटीचे अध्यक्ष प्रा़ अशोक काजळे, आ़ सुभाष देशमुख, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्यासह सोसायटीचे सभासद यावेळी उपस्थित होते़ जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर बुधवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे़ मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही़

Web Title: Request to Chief Minister of Karnikagaragar Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.