वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांची नाराजी

By Admin | Published: January 24, 2016 10:20 PM2016-01-24T22:20:50+5:302016-01-24T22:20:50+5:30

जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Resentment of the students due to lack of time | वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांची नाराजी

वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांची नाराजी

googlenewsNext
गाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील १२ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या अभ्यासक्रमात एमपीएससीने बदल केला आहे. त्यामुळे ज्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न हे जरी अभ्यासक्रमावर आधारित असेल, तरी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन जमले नसल्याची माहिती दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांनी दिली. २३ पानांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ एक तास अवधी देण्यात आला होता. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३ हजार ५१९ विद्यार्थी प्रवीष्ठ होते. पैकी १ हजार ७९५ विद्यार्थी हजर होते. तर १ हजार ७२४ विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
वेळेचे नियोजन करा
प्रश्नपत्रिका तशी अवघड नव्हती. परंतु, नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नियोजन करता आलेले नाही. पुढील वेळेस विद्यार्थ्यांनी नियोजन करून परीक्षेला सामोरे जावे, असे गोपाल दर्जी यांनी सांगितले आहे.

Web Title: Resentment of the students due to lack of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.