उमविमधील पदभरती स्थगीत करा
By admin | Published: July 21, 2016 10:23 PM2016-07-21T22:23:15+5:302016-07-21T22:23:15+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Next
ज गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अभाविपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांचा कालावधी ७ सप्टेंबर २०१६ रोजी संप असल्यामुळे नवीन कुलगुरू नेमणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. कुलगुरू मेश्राम यांचा कालावधी वर्षद्वेषी, जातीयवादी आणि वादग्रस्त राहीला आहे. या भरतीमध्ये अनुसूचीत जाती संवर्गाची पदे अधिक भरली जाऊ शकतात. कायमस्वरूपी पदभरती करताना आरक्षण निश्चित करायला हवे. परंतु विद्यापीठाने प्रकाशीत केलेल्या पदभरती जाहीरातीमध्ये भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील सहयोगी प्राध्यापक मराठी/ हिंदी या दोन पदांचे दोन आरक्षण सुनिश्चित केलेले नाही. मुलाखतीवेळी ते आरक्षण ठरेल, असे म्हटले आहे. यातही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना डावलले जाऊ शकते. शासनाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. ८० टक्के पदे भरण्याचे आदेश आहेत. यातच मराठी विषयाची दोन पदे यापूर्वी भरलेली असतानादेखील सहयोगी प्राध्यापक, मराठी या पदाची जाहीरात करून शासनादेशाचे उल्लंघन केले आहे. या कारणांचा विचार करून या पदभरतीला स्थगिती द्यावी, अशी विनंती अभाविपने राज्यपाल यांना केली आहे.