कॅम्पसमधल्या फ्लॅशबॅकमध्ये काही आठवणी सापडल्या तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:22 PM2017-08-11T15:22:01+5:302017-08-11T15:23:51+5:30
इंजिनिअरिंग पास झाल्यावर चार वर्षानी कॉलेजात गेलो आणि सारं पुन्हा जागं झालं.
-अश्विन उमाळे, अमरावती
चार वर्षे झाली इंजिनिअरिंग पास होऊन. डिग्री घेतल्यानंतर कॉलेजमध्ये पाऊल टाकलंच नाही. हल्ली कॉलेज मध्ये फस्र्ट इअर अॅडमिशन प्रोसेस सुरु झाली. त्यासंदर्भात काही ज्युनिअर्स आले सल्ला विचारायला. त्यांना पाहून आठवलं की आपल्यावेळी आपणही असेच आपल्या सिनिअरकडेगेलो होतो. मग त्यांना सांगितलं काय चांगलं आहे व काय वाईट. तेवढ्यातच माझा मित्न डीजेचा कॉल आला. चल म्हणे कॉलेजमधून टीसी काढायची आहे. गेलो मग आणि टाकला कॉलेज मध्ये पाय. पार्किगमधूनच आठवणींची चेन सुरु झाली. मोत्यांची माळ. एक मणी निघाला कि बाकीचे मणी एकामागून एक धावत येतात.
पार्किगच्या थोड्या पुढे कट्टा, कट्ट्यावर कॉलेज युनिफॉर्म मध्ये बसलेल्या पाखरांचा थवा, तेथे रंगलेल्या गप्पा. तारुण्याच्या उंबरठा ओलांडून आलेले कोवळ्या वयातले मुलं मुली. आपल्याच तालात मग्न, दुनियादारी पासून काही वर्षे दूर. बटण दाबली आहे, आता थोड्या वेळातच स्वप्नांची लिफ्ट आपोआप दरवाजा उघडेल आण िमग आपण स्वप्नांचे माजले चढू. खूप काही सुचत आहे या विषयावर लिहिण्यासारखं पण सावरला पाहिजे स्वतर्ला.
मग आम्ही गेलो अॅडमिनिस्ट्रेश ऑफिसमध्ये. सरांना म्हंटलं टीसी काढायची आहे. अर्धा तासाने अॅप्लिेकेशन लिहून आणा म्हणे इथेच. आम्हाला वाटलंच होत असा काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून. खूप दिवसांनी आहे शब्द कानावर पडले आमच्या. मग डीजे झाला सुरु . डीजे म्हणजे माझा मित्न. त्याला तर हेच पाहिजे होत. मला म्हणाला ये तुला अध्र्या तासात माझा आयुष्यातला हॅपी टाईम सांगतो आणि दाखवतो पण.
हे बघ म्हणे नोटीस बोर्ड ज्याला आम्ही आरशासारखे वापरायचो. आपला नंबर दिसल्यावर न चुकता तिचाही नंबर पाहण्याचं कर्तव्य पार पडायचं. तिचा नंबर दिसला कि अॅडमिशन घेतल्याचं समाधान मानायचं. देवाला धन्यवाद द्यायचा. आणि त्या गर्दीतून बाहेर पडल्यावर जेव्हा तीच एकदम समोर दिसली कि स्लो मोशन सुरु . अगदी हिंदी सिनेमा सारखं. तीच पुढे येऊन आपल्याशी बोलली तेव्हा मनात लड्डू फुटतात अन सगळ्या क्लास समोर बोलली कि बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटत.
कॉलेजचं कॅण्टिन म्हणजे कॉलेजचा दागिना. मुले तिथे नास्ता एन्जॉय करत होती. तिथे दिसल्या दोन मुली एक कॅडबरी फाईव्ह स्टार शेअर करताना. मग आला गरमा गरम सामोसा कचोरीचा सुगंध. असो. डीजेची बडबड काही थांबत नव्हती. सांगत होता केमिस्ट्रीमधली लॅब मधली मजा, सर लोकांची टिंगल, मित्नांसोबतच्या टवाळक्या, फस्र्ट प्लोअरवरुन ग्राऊण्ड फ्लोअरवर केलेल्या खाणाखुणा, इशार्यात बोलणं. अर्थाचे चांगलेच अर्थ लावणं. ऊन सावलीचे खेळ, कितीही सांभाळला तरीही भावनांचा तोल जाणं. पावसात भिजल्यावरही मनाची तहान उरणं अन मग लांब श्वास घेऊन म्हणणं जाऊदे चल.
खरं तर आपला भूतकाळच येतो न आपल्या समोर. सगळ्यांसोबतचा झालं असत असं. नेहमीप्रमाणे कट्ट्यावर मुलं दिसली मुली पाहताना. त्यांच्या भाषेत याला पक्षीनिरीक्षण असेही म्हणतात. डीजेकाही केल्या बोलायचं थांबेना. आणि मी तर सगळं अगदी सीसीटीव्ही सारखं ऑब्जव्र्ह करत होतो. माझ्या लक्षात आलं कि मी आता असा झालोय कि फस्ट इअरची मुलगी फायनल इअर्पयत पर्यंत कशी दिसेल ! जाऊ द्या, जोक होता.
मग डीजेनं त्यीची लव्हस्टोरी सांगितली.हरवला तो त्या दिवसांत.
आम्ही अर्ज दिला. टीसी साठी 15 दिवसांनी या असं म्हणाले ते, म्हणून मग निघालो. तेव्हा आठवल्या
जावेद अख्तर साहेबांच्या खूप सुंदर ओळी.
कहीं तो दिल में यादों की
इक सूली गढ जाती है,
कहीं हर एक तस्वीर बहुत ही
धुंधली पड जाती है,
कोई नयी दुनिया के
नए रंगों में खुश रहता है,
कोई सब कुछ पाके भी
ये मन ही मन कहता है.
कहने को साथ अपने
एक दुनिया चलती है,
पर छुपके इस दिल में तन्हाई पलती है
बस याद साथ है
तेरी याद साथ है..